जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२४-२५ छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे ६ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान उत्साहात संपन्न झाली.
विविध शाळांच्या नाट्य सादरीकरणांनी स्पर्धा गाजविली. या स्पर्धेचा गुरूवारी ९ जानेवारी रोजी समारोप करण्यात आला. या निमित्ताने सादर झालेली नाटके पुढीलप्रमाणे होती: १. चिमी – जीवन विकास सामाजिक संस्था अंतर्गत नानासाहेब आर. बी. पाटील विद्यालय, जळगाव. २. जय गणेश फाउंडेशन, भुसावळ यांचे वारसा. ३. ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी आराशा यांचे वारी. ४. भावी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली यांचे सायली. ५. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव यांचे व्हॉट्सअप चा तमाशा.
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नाट्यकलेच्या माध्यमातून बाल कलाकारांनी समाजाभिमुख संदेश देत प्रेक्षकांची मने जिंकली. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण शेखर भागवत, गौरी लोंढे, राजू वेंगुर्लेकर, यांनी केले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि समन्वयासाठी प्राध्यापक संदीप तायडे यांनी परिश्रम घेतले.