भडगाव येथे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांचे निवेदन

भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना (CMYTP) अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांनी भडगाव प्रशासनाला एक निवेदन सादर केले आहे. ज्यात त्यांनी विविध समस्यांवर प्रशासनाच्या लक्षवेधी मागण्या मांडल्या आहेत. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राज्यातील युवांचा शालेय शिक्षणामध्ये सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली होती. तथापि, योजनेतील शिक्षकांच्या अनुभवावर लक्ष देताना अनेक समस्यांचा सामना करण्याची बाब समोर आली आहे.

सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार त्या पदावर दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रतेनुसार आमचा कालावधी वाढून मिळावा.कालावधी वाढवून मिळाल्यानंतर आम्हाला त्याचं ठिकाणी नोकरी देऊन आमचं मानधन वाढवून मिळावे, ज्या प्रशिक्षणार्थी यांनी सहा महिने सेवा दिली, त्यांना शासकीय भरती प्रक्रियामध्ये १० टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात, आम्ही एवढे शिक्षण घेतले असून आम्हाला त्या शिक्षणाचा काही उपयोग व्हायला हवा त्यामुळे आपण आम्हाला आपण कालावधी वाढवून द्यावा, आमचे थकीत मानधन लवकर मिळावे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही प्रत्येक शाळेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहोत व पुढे ही करत राहु, तसेच आम्हचा कार्यकाळ जर वाढवला नाही तर आम्हावर उपासमारीची व बेरोजगाराची वेळ येईल आम्ही शिक्षण केलेलं वाया जाईल म्हणून आमच्या सर्व मागण्या मंजूर करुन आम्हाला न्याय मिळाला ही उपेक्षा आहे.

यावेळी धनराज पाटील, सोनम पाटील, धनंजय पवार, गणेश पाटील, वैशाली माळी, माधुरी देसले, पुजा कुमावत, अश्विनी वसईकर, श्रुती पाटील, ऐश्वर्या चव्हाण, मोहिनी जाधव, प्रिया पाटील, दिनकर भिल, विशाल पाटील, विकास सावंत, मोहिनी महाजन, वैशाली पवार, अमोल पाटील, सतिश गांगुर्डे, रुचिका पाटील, इंदिरा पाटील, पुजा महाजन, शितल भाभरे, अभिजित जाधव व रविंद्र भराडी हे युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक व शिक्षिका यांच्या सह्या चे निवेदन देण्यात आले.

Protected Content