यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील इंदिरा गांधी उर्दू माध्यमिक विद्यालयात नविन शैक्षणिक धोरण २०२० या संदर्भात शाळेत यावल महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या. डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेच्या मुख्याध्यापिका मुमताज मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुधीर कापडे यांनी सांगितले की भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत शिक्षण रचनेत प्रयोगत्माक शिक्षणावर कसा भर दिला आहे ते सांगताना शैक्षणिक श्रेय संरचना मुख्य आणि गौण विषयांची निवड जनरल इलेक्टिव्ह, ओपन रोजगार, क्षमतेसाठी प्रोत्साहन, क्षमता विकास विषय भारतीय ज्ञान प्रणाली इत्यादी विषयावर विस्तृत माहिती सांगितली.
प्रा. इमरान खान यांनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की नविन शैक्षणिक धोरण२०२० ची वैशिष्ट्य विशद केली तसेच नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शालेय शिक्षण घटक तयारी मध्यम टप्पा व तिसरा टप्पा सांगितला नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची मुख्य वैशिष्ट्ये व नवीन अंमलबजावणी विषय माहिती सांगितली तसेच श्रेयांक स्तराचे टप्पे विशद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मुमताज मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वांसाठी आव्हानात्मक आहे. तसेच सध्याच्या स्पर्धात्मक युगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी कौशल्ययुक्त शिक्षण उपयुक्त आहे असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाला इफ्तेखार अहमद, इमाम, सलीम व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित होते