जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर शहरातील कस्तुरी नगर भागामध्ये दिनांक 8 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत भव्य संगीतमय शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. जामनेर शहरातील कस्तुरी नगर जामनेर पुरा या भागातील ओंकारेश्वर महादेव मंदिराचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त ओंकारेश्वर मंदिरावर भव्य दिव्य संगीतमय शिव कथा पुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कथा मधुरभाव कथाकार रसमूर्ती परमपूज्य श्रीहरीदास जी महाराज हे करणार आहे संगीतमय भव्य शिवपुराण कथा दररोज रात्री साडेआठ ते साडेदहा वाजेच्या दरम्यान होणार असून सात दिवस चालणार आहे या शिवपुराणकथेमध्ये सामूहिक रुद्राक्ष अभिषेक व रुद्राक्ष वाटप केले जाणार असून या शिवपुराण कथेला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांची उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर या कथेसाठी विशेष योगदान भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांचे आहे. सदर संगीतमय शिवपुराण कथेचा लाभ जास्तीत जास्त भक्तांनी घेण्याचे आव्हान आयोजक सुभाष पवार व कस्तुरी नगर पटेल नगर जामनेर पुरा भागातील ग्रामस्थांनी केले आहे.