जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महापालिकेतील जुन्या जलवाहिनीच्या पाईप चोरी प्रकरणी माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
जळगाव शहराच्या जुन्या पाईपलाईनच्या चोरी प्रकरणात महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सोमवारी यावर सुनावणी झाली असता त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, याच प्रकरणात भावेश पाटील, कुंदन पाटील व सादीक खाटीक यांना न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. सुनील महाजन यांच्यावर दोन पोलीस स्थानकांमध्ये तीन गुन्हे दाखल असून याच प्रकरणी त्यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे.