जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका ३८ वर्षी महिलेचा विषारी औषध घेतल्याने उचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फारदानबी सलीम खान वय ३८ रा. गेंदालाल मिल, जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसरात फारदानबी सलीम खान या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होत्या. शुक्रवारी ३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास महिला ही घरात असतांना त्यांनी विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्यांचा प्रकृती खालावली, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रविवारी ५ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील हे करीत आहे.