जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात विषारी औषध घेतल्याने त्यांचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे. परवेश जब्बार खाटीक वय २६ रा. म्हसावद ता. जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद गावात परवेश खाटीक हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. शनिवारी २८ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावल्याने त्याच्या नातेवाईकांनी तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. विषारी औषध घेतल्याचे कारण समोर आले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्नील पाटील हे करीत आहे.