यावल येथे परभणी घटनेच्या व अमित शहांच्या वक्तव्यांच्या निषेर्धात रॅली

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील परभणी येथील भारतीय राज्यघटनेचा अपमान व विटंबना करण्यात आला असून संबंधित व्यक्ती इसमा वरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत आणि महाराष्ट्राच्या जातीय सलोखा कायम राहील.

याच घटनेमध्ये परभणी येथील पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाचे न्यायालयीन चौकशी कलम 176(1A) सी आर पी सी अन्यवे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व या प्रकरणात पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 32अन्यवे ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 3(1) आणि 3(2) प्रमाणे गुन्हे दाखल करावे सोबतच मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा. या प्रकरणांमध्ये परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मृत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना तात्काळ एक कोटीची आर्थिक मदत करावी व घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, तसेच जखमींना 25 लाख नुकसान भरपाई द्यावी. सर्व भरपाई पोलिसांकडून वसूल करावी अशामुळे पोलीस दलातील या अनियंत्रित पोलिसांवर नियंत्रण राहील व याचबरोबर दरम्यान च्या काळात गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल भर संसदेत बेताल वक्तव्य करून अपमान केला आहे.

या घटनेच्या संपूर्ण भारतात विविध आंदोलने होत असून या घटनेचे देशभरात नव्हे तर जगात सर्वत्र जाहीर निषेध होत आहेत त्यांनी संपूर्ण भारतातील आंबेडकरी जनतेच्या अनुयायीच्या भावना दुखावल्या असून केलेल्या अपमाना बद्दल त्वरित राजीनामा देऊन गृहमंत्री अमित शाहा यांनी संपूर्ण आंबेडकरी समाजाची जाहीर माफी मागावी, या संपूर्ण घटनेबद्दल यावल येथील बुरुज चौक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फलकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून निषेध रॅली काढण्यात आली या रोलीत देशाचे बेजबाबदार गृहमंत्रीअमित शाहा याच्या बद्दल मुर्दाबाद मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या व निषेध रॅली काढून यावल तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना आंबेडकर चळवळीतील संपूर्ण कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन दिले याप्रसंगी तालुक्यातील आंबेडकर चळवळीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content