Home Cities जळगाव परिवर्तन मैत्र महोत्सवाचे भाऊंच्या उद्यानात आयोजन

परिवर्तन मैत्र महोत्सवाचे भाऊंच्या उद्यानात आयोजन

0
123

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परिवर्तन जळगाव आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या वतीने परिवर्तन मैत्र महोत्सव दिनांक 21 ते 29 डिसेंबर असा नऊ दिवसाचा भरगच्च महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे . भाऊंच्या उद्यानातील एम्फी थियेटर मध्ये रोज सायंकाळी सहा वाजता विविध प्रयोग सादर होणार आहेत.

गेल्या वर्षापासून परिवर्तन “मैत्र” महोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्व कलांना एकत्र करून कलेचा अविष्कार घडवणे हे परिवर्तनच नेहमीच ध्येय राहिलेला आहे. महोत्सव संस्कृती रुजवणे हे देखील परिवर्तनचे नेहमीच ध्येय राहिलेले आहे. सतत होणाऱ्या महोत्सवांमुळे सांस्कृतिक पायाभरणी होते. जळगाव शहराला सांस्कृतिक ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न देखील जैन उद्योग समूह व परिवर्तन यांनी नेहमीच केला आहे. यामुळेच या महोत्सवात संगीत, साहित्य, नृत्य, नाट्य, चित्रकला अशा विविध कलांचा समावेश या महोत्सवात करण्यात आलेला आहे. रसिकांना या सर्व कलांचा आस्वाद या महोत्सवात घेता येणार आहे. स्थानिक कलावंतांच्या सोबतच मुंबई, पुणे व नागपूर येथील गाजत असलेल्या कलाकृतीचा आस्वाद देखील रसिकांना मिळणार आहे.

या महोत्सवाचे प्रमुख डॉ. रेखा महाजन, इंजि. प्रकाश पाटील, नंदू भाई अडवाणी, आर्किटेक्ट शिरीष बर्वे , इंजिनीयर विनोद पाटील, उद्योजक स्वरूप लुंकड , पारस राका , मानसी गगडाणी असणार आहेत. यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हा महोत्सव साजरा होणार आहे. जैन उद्योग समूह व अशोक जैन यांचे मोलाचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे. या महोत्सवासाच्या यशस्वीतेसाठी परिवर्तनचे नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, प्रविण पाटील, हर्षल पाटील, सुदीप्ता सरकार, होरीलसिंग राजपूत , मनोज पाटील, विजय जैन, बिना मल्हारा, मानसी जोशी, अंजली पाटील, लीना लेले, जयश्री पाटील, सुनील बारी, विनोद अजनाडकर, नेहा पवार, विकास वाघ, श्र्वेतांबरी गरुड, मंगेश कुलकर्णी, उदय सपकाळे, भगवान भोई, अनिल जानकिराम चौधरी , योगेश चौधरी, गणेश सोनार प्रयत्नशील आहेत. हा महोत्सव सगळ्यांसाठी खुला असून याचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवर्तन व जैन उद्योग समूहा कडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound