ब्रेकींग न्यूज : जळगावात धडक मोहीम राबवत २५० रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगाव शहरात रिक्षा चालकांवर धडक कारवाई केली आहे. पोलीसांनी जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागात जावून ही कारवाई केली आहे. आतापर्यंत २५० हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांनी दिली आहे.

जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये बुधवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी जळगाव शहर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानाने नियमांचे उल्लंघन करणारे तसेच सोबत बिल्ला न ठेवणे, रिक्षा चालवण्याची परमिट नसणे, विनापरवाना गॅस कीटवर वाहन चालवणे, पियूसी नसणे, इन्शुरन्स नसणे आणि जादा प्रवासी भरून वाहतूक करणे अशा रिक्षा चालकांवर आज मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये आतापर्यंत २५० गुण अधिक रिक्षा जप्त करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान आता प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत असून नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी दिली आहे.

Protected Content