भरधाव ट्रॅक्टरने महिलेला चिरडले; चालकावर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विटनेर गावाजवळ असलेल्या शिव ढाबा समोर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील ४२ वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात चौकशी अंती अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीता भगवान पाटील वय 42 राहणार माळ पिंपरी ता. जामनेर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील महाड पिंपरी गावात गीता पाटील या आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. २ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता गीता पाटील ह्या त्यांचा पुतण्या गणेश भास्कर पाटील (वय-४० रा. माळ पिंपरी ता. जामनेर) यांच्यासोबत दुचाकीने वावडदा येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान जळगाव तालुक्यातील विटनेर गावासमोरील शिव ढाबा जवळ भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे या अपघातात गीता पाटील या रोडवर पडल्या आणि तेवढ्यात त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे पाटील कुटुंबावर शोककळा पसरली. दरम्यान चौकशी अंतिम अखेर पुतण्या गणेश भास्कर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार १२ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर बळीराम दाढे रा. पळासखेडे मिराचे ता. जामनेर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ हे करीत आहे.

Protected Content