जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कामावरून दुचाकीने घरी जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे तरूण जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता वाकी-पहूर रस्त्यावरील सोनाळा फाट्याजवळ घडली आहे. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवा शंकर सरताडे वय-३० आणि राहुल नागो तेली वय-२८ दोन्ही रा. वाकी ता. जामनेर हे गुरुवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता दुचाकीने पहूर येथून वाकी येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाले. पहूर ते वाकी दरम्यानच्या सोनाळा फाट्यावर अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर शिवा यांच्या हातापायाला जखमा झाले आहेत. दोघांना खाजगी वाहनातून जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान याबाबत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.