गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भिलपुरा चौकात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनातून दोन गुरांची सुटका करण्यात आली असून वाहनधारकावर कारवाई करण्यात आल्याची घटना मंगळवार १० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याबाबत दुपारी १२ वाजता पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील भिलपुरा चौका परिसरातून एका चारचाकी बोलेरो पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय ००९६) या वाहनातून दोन गुरांची वाहतूक होत असल्याचे गोपनीय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पथकाने मंगळवारी १० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता कारवाई करत दोन गुरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल इंदल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख जमील शेख अब्दुल रहमान कसाई वय-२५, रा.चोपडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी हे करत आहे.

Protected Content