
अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील एका भागात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी पायी जात असतांना शहरातील पाचपावली देवी मंदीराजवळ दोन जण दुचाकीवर आले व दुचाकीवर बसण्याचा बहाणा करून तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


अमळनेर शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पिडीत मुलगी शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शहरातील पाचपावली देवी मंदीराजवळून पायी जात असतांना संशयित आरोपी अमोल भरत पारधी आण शुभम रमेश पारधी दोन्ही रा. अमळनेर हे दोघे दुचाकीवर आले. त्यानंतर पिडीत मुलीला दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यावर मुलीने नकार दिल्याने दोघांनी तिची ओढणी ओढून विनयभंग केला. दरम्यान पिडीत मुलीने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अमोल भरत पारधी आण शुभम रमेश पारधी दोन्ही रा. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर े करीत आहे.


