Home क्राईम गिरणा नदीपत्रात वाळू उपसा करणारे ३ ट्रॅक्टर पकडले

गिरणा नदीपत्रात वाळू उपसा करणारे ३ ट्रॅक्टर पकडले


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रातून अवैधपणे वाळूचा उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर धरणगाव महसूल पथकाने शनिवारी ७ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता तीन संशयितांवर कारवाई करत ३ ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बांभोरी गावाजवळील गिरणानदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधपणे वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती धरणगाव महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी ७ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता धडक कारवाई केली आहे. गिरणा नदीपात्रामध्ये उभे असलेल्या ३ ट्रॅक्टरमध्ये अवैधपणे वाळूचा उपसा केला जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार महसूल पथकाने वाळू उपसा करण्यासंदर्भात परवानगी मागितली. परंतु ट्रॅक्टर चालकाने उडाउडवीची उत्तरे दिली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महसूल पथकाने तिघे ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी बांभोरी गावातील संतोष उत्तम नन्नवरे, दिनेश भागवत नन्नवरे, रविंद्र जंगलू कोळी या तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound