देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत सत्ता स्थापनेचा केला दावा; राज्यपालांकडून निमंत्रण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ११ दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. मुंबईत आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एक मुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसतो आहे.

विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. महायुतीमधील प्रमुख नेते फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे. असे असताना त्यापूर्वी महायुतीतील अनेक प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहे.या भेटीत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते एकाच गाडीतून राज भवनावर पोहचले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीन नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहेत. तर या शपथविधीसाठी इतर पक्षाचे अनेक दिग्गज नेते आणि प्रमुख ही हजेरी लावणार आहे. महायुतीच्या शपथविधी समारंभात तिन्ही पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेते ही हजेरी लावणार आहेत.

Protected Content