धरणगाव महसुल पथकाची कारवाई; पथकाशी वाद घालून शासकीय कामात अडथळा
धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील आव्हाणी शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून चोरी वाहतूक करणाऱ्यांवर धरणगाव महसुल पथकाने मंगळवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई करण्यात आली. यावेळी वाळूमाफियांनी पथकाशी वाद घालवून वाळूने भरलेले ७ ट्रॅक्टर घेवून पसार झाले आहे. परंतू जप्त केल्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री १०.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी शिवारातील गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव महसुल मंडळाला मिळाली. त्यानुसार महसुल पथकाने मंगळवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता कारवाई केली आहे. त्यानुसार पथकाने थेट नदीपात्रात उतरून वाळू ट्रॅक्टरमध्ये भरतांना कारवाई केली. यावेळी वाळू वाहतूकदारांनी पथकाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत शासकीय कामात अडथडा निर्माण केला. त्यानंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून पसार झाले. याप्रकरणी मंडळाधिकारी लक्ष्मीकांत वसंत बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री १०.३० वाजता अक्षय पाटील, उज्वल पाटील दोन्ही रा. पाळधी ता.धरणगाव, गणपत नन्नवरे, सोन नन्नवरे, विशाल नन्नवरे तिघे रा. बांभोरी ता.धरणगाव, किरण राजपूत रा. फुलपाट आणि नाना पाटील रा. आव्हाणी ता.धरणगाव या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रविण तांदळे हे करीत आहे.