जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गावातून जात असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तुटलेला एक्सल दुरुस्तीसाठी लावलेला जॅक निसटल्यामुळे मॅकेनिक सोबत आलेल्या तरूणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी जळगाव तालुक्यातील बोरनार गावात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील बोरनार गावातून जात असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीचा एक्सल तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर पलटी होवून अपघात झाला. एक्सल दुरुस्तीसाठी एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथून मॅकेनिक ने सोमनाथ गोरख कोळी (वय २०, रा. भातखेडा, ता. एरंडोल) याला सोबत घेवून ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी मंगळवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास गावात आले. ट्रॅक्टरचा तुटलेला एक्सल दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी ट्रॉलीला जॅक लावून कामाला सुरुवात केली. मात्र काम सुरु असतांना अचानक ट्रॉलीला लावलेला जॅक निसटल्यामुळे दुरुस्तीसाठी मदत करणारा सोमनाथ कोळी हा ट्रॉलीखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला बाहेर काढले, मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी तपासणी करीत मयत घोषीत केले