Home राज्य लाडकी बहीण योजनेचा पुढचा हफ्ता कधी येणार ?; जाणून घ्या माहिती

लाडकी बहीण योजनेचा पुढचा हफ्ता कधी येणार ?; जाणून घ्या माहिती


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र सरकारन जुलै २०२४ मध्ये सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यभरातील महिलांना आर्थिक सहाय्य पुरवत आहे. या योजनेंतर्गत, पात्र महिलांना मासिक 1,500 रुपये वेतन मिळते, जे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्यांना महत्त्वपूर्ण सहाय्य प्रदान करतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या योजनेचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला. सतताधारी महायुतीस मोठा विजय मिळाल्याचे श्रेय या योजनेला दिले जात आहे. दरम्यान, या योजनेतील हाप्ते या आधी मिळाले असले तरी, पुढचा हप्ता कधी येणार याबाबत उत्सुकता आहे. अनेक लाभार्थी डिसेंबर 2024 च्या हप्त्याबाबत अद्ययावत माहितीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जाणून घ्या लाडकी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येऊ शकतो?

महिला आणि बालविकास मंत्री अदिती एस. तटकरे यांनीऑक्टोबरमध्ये एक्सद्वारे पुष्टी केली की, ही योजना अखंडितपणे सुरू राहील. दरम्यान, 4-6 ऑक्टोबर 2024 दरम्यान, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरसाठी 2.34 कोटी लाभार्थ्यांना 1,500 रुपये आगाऊ वितरित करण्यात आले.

डिसेंबरच्या हप्त्याची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, सूत्रे आणि प्रसारमाध्यमांतील वृत्त सूचवत आहे की, महाराष्ट्राच्या नवनियुक्त सरकारचा शपथविधी लवकरच पार पडेल. हा शपथविधी पर पडून एकदा का नवे मुख्यमंत्री आणि सरकार सत्तेत आले की, पुढच्या काहीच काळात हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो. अर्थात मुख्यमंत्री शपथविधीची तारीख अद्यापही निश्चित न झाल्याने हप्ता कधी मिळेल याबाबत निश्चित तारीख सांगितली जात नाही. दरम्यान, आगोदरच्या सरकारमधील मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थ्यांना आश्वासन देत सांगितले की, सर्व पात्र महिलांना त्यांची डिसेंबरची देयके वेळेवर मिळतील. ही योजना खंडीत करण्याबाबतच्या चुकीच्या माहितीवर महिलांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.


Protected Content

Play sound