जळगावात क्रिकेट खेळण्यावरून दगडफेक; चार जण ताब्यात

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मोकळ्या जागेत क्रिकेट खेळतांना मुलांमध्ये वाद होवून दोन गटात तुफान दगडफेक झाली. यामध्ये एका टोळक्याने केलेल्या तुफान दगडफेकीत दोन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी दुपारी वाजता राम नगरातील गजानन नगरात घडली. या प्रकरणात दोन्ही गटातील चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील राम नगराला लागून असलेल्या गजानन नगरातील खुल्या जागेत शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता काही मुलं क्रिकेट खेळत होती. यावेळी त्या तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला, वादाचे रुपांतरण हाणामारीत होवून दोन्ही गट समारासमोर आले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. त्यात विजय जयस्वाल व निशांत जयस्वाल हे दोघं जण जखमी झाले. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या दगडफेकीमध्ये विजय जयस्वाल व निशांत जयस्वाल हे दोघे जमखी झाले. जखमींना एमआयडीसी पोलिसांनी मेडीकल मेमो दिला असून त्यानुसार त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  पोलिसांनी चार जणांना ताब्यात चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Protected Content