जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नेहरू युवा केंद्र जळगावच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ व राष्ट्रीय सेवा योजना भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने MYBharat मार्फत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संविधान मंदिरात सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मूलभूत कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली. संविधान दिनानिमित्त MYBharat स्वयंसेवक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 250 विद्यार्थ्यांनी नाहाटा चौकापर्यंत पदयात्रा काढली.
कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळचे विद्यार्थी आणि MYBharat स्वयंसेवकांनी नरेंद्र, जिल्हा युवा अधिकारी, N.Y.U.K. जळगाव आणि श्री दीपक कोळी, कार्यक्रम अधिकारी, रा.से.यो. भुसावळ यांच्या नेतृत्वाखाली केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळचे प्राचार्य एम.एस. राजपूत, समूह संचालक एल. आर. पाटील, सुनील गाजरे, आर. आर. गाजर, आर. आर. देवकर, अजिंक्य गवळी, थोरात राजुव व मानकर अभय आदी उपस्थित होते.