जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सैय्यद नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे शहिदांना २६/११च्या भ्याड हल्ल्यातून पोलीस अधिकारी व कर्मचारी हे शहीद झाले होते. या अनुषंगाने आज २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शहीदांना मेणबत्ती लावून श्रध्दांजली अर्पण करण्यात आले.
आपल्या महाराष्ट्राची व भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई वर पाकिस्तानच्या दुष्ट आतंकवाद्यांनी आजच्याच दिवशी २६/११ ला भ्याडपणे अमानुष हल्ला केलेला होता. त्या हल्यात अनेक निर्दोष, निष्पाप नागरिक व या हल्ल्यापासून आपल्या भारतमातेचे, आपल्या मातृभूमीचे, व आपल्या नागरिकांचे रक्षणकरतांना आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख पणे बजावतांना शहीद झालेल्या पोलीस, सैनिकांना आज 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भिलपुरा चौकात सै. नियाज अली भैय्या फौंडेशनतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी फौंडेशन च्या सदस्यांनी हातात पेटत्या मेणबत्या घेऊन दोन मिनिट स्तब्ध उभे राहून शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी सै. नियाज अली भैय्या फौंडेशन चे सै. अयाज अली नियाज अली, हाजी सलीम कुरेशी, इलियास नुरी, शफी ठेकेदार, सलमान मेहबुब, झिशान हुसैन, सोनू सिकंदर, मतीन नूर बशर, सलीम कच्ची, सुपडू पेंटर, ओवेश शेख, अल्फाद असगर, अझीझ इब्राहिम, हामिद खान, सलीम शाह, नूर मोहम्मद, शेख मोईन इ. उपस्थित होते.