जिल्हाधिकारी कार्यालयात एकता संघटनेतर्फे संविधान दिन व हुताम्यांना श्रध्दांजली अर्पण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या वतीने मंगळवार २६ नाव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त भारताच्या संविधानाची उद्देशिकाचे वाचन करण्यात आले व त्याची शपथ घेण्यात आली. तसेच सोळा वर्षांपूर्वी मुंबई येथे २६/११ च्या भ्याड हल्ल्यामध्ये १८ सुरक्षा करणे कर्मी व १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्या शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सर्वप्रथम मौलाना रहीम पटेल यांनी पवित्र पुरवण्याचे पठण केले. एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी संविधान दिन २६/११ च्या भ्याड हल्ल्याबाबत तसेच मंथरमधील झालेल्या अन्यायाची माहिती विषद करून संविधान उद्देशिकाचे वाचन करून उपस्थितांकडून उद्देशिकेची शपथ घेतली.

याप्रसंगी मुफ्ती खालिद, हाफिस अब्दुल रहीम, फारुख शेख, नदीम मलिक, सय्यद चांद, मझहर पठाण, आरिफ देशमुख, अनवर खान, जकी पटेल, युसुफ खान, खलील अहमद, सय्यद इरफान, अर्शद शेख, अकील खान कॉमरेट, कासिम उमर, शाहीर तेली, जलाल शेख, इरफान शेख, उमर कासिम, सय्यद अजहर, युसुफ खान, इमरान शेख, तय्यब टेलर रावेर, समीर शेख यांची उपस्थिती होती.

Protected Content