Home Cities जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे २६/११च्या हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण

जिल्हा पोलीस दलातर्फे २६/११च्या हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण

0
110


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शहिद पोलीसांना जळगाव पोलीस मुख्यालयात आज श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह जळगाव पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक अधिकारी यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्रध्दांजली देण्यात आली.


Protected Content

Play sound