पारोळा-विकास चौधरी | एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी नुकत्याचा पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत ५६ हजाराचे लीड घेऊन आपल्या विजयाची सुरुवात केली आहे. खरंतर या एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षभरापासून अमोलदादांची चर्चा सुरू होती. त्यांची भावी आमदार अमोल पाटील असे फलक देखील त्यांच्या वाढदिवसाला लागले होते.
अमोल चिमणराव पाटील यांचा कार्यकर्ता व मॅनेजमेंट गुरु ते आमदार असा प्रवास राहिलेला आहे. आमदारकी अमोलदादांना सहजासहजी देखील मिळालेली नाही. त्यांची मेहनत त्यांचे काम त्यांची कार्यकर्त्यांशी जुळलेली नाळ याशिवाय त्यांच्या तालुक्यातील मतदारांशी असलेला जनसंपर्क ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार व आपल्या मॅनेजमेंट गुरु या युक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये चिमणआबांच्या आमदारकीचा पुरेपूर फायदा घेऊन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गल्लीबोळात ग्रामीण भागामधील अनेक ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी दिला.
अनेक ग्रामपंचायतींचा चेहरा मोहरा देखील अमोल पाटलांनी बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यामुळे अमोल पाटलांना कार्यकर्ता मॅनेजमेंट गुरु ते आमदार हा प्रवास अतिशय कठीण म्हणूनच त्यांनी पार केलेला आहे. अमो दादांनी चिमणराव पाटलांचे आमदारकीच्या सर्व निधीच्या नियोजन सांभाळले होते. कोणालाच नाराज न करता कार्यकर्त्यांची फळी देखील उभी केली विकास कामे देखील म्हणूनच यावेळी चिमणआबांनी देखील अमोलदादांला संधी दिली.
सर्वात तरुण आमदार जळगाव जिल्ह्याला पारोळा एरंडोल मतदारसंघांमधून अमोल पाटील यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आमदार चिमणराव पाटील यांनी देखील आपले अनेक विकास कामांची जबाबदारी अमोल पाटील यांच्यावर दिली होती. म्हणूनच आज सर्वाधिक मते घेऊन चांगल्या चांगल्यांना पराभूत करून अमोलदादांनी हा गड राखला. यामुळे येणाऱ्या काळात अमोलदादांवरती मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यांनी उर्वरित विकास कामे जी सुरू आहे ती पुन्हा जोमाने पूर्ण करणे मोठ्या प्रमाणात निधी आणणे.
एमआयडीसीसाठी प्रयत्न करणे तरुणांना रोजगार कसा मिळेल याबाबत विचार करून आवाज उठवणे व एरंडोल पारोळा मतदार संघात काय काय आणता येईल काय काय घेता येईल ते घेणे सत्तेच्या माध्यमातून जे शक्य असते तेच मिळते तसेच सत्य शिवाय शहाणपणा नसतो. परंतु सत्तेच्या माध्यमातून विकास कामे ही मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात विकास कामांचे ओझे आहे ते त्यांनी पेलावे व दिलेला शब्द खरा करून दाखवावा अशी रास्ता अपेक्षा कार्यकर्ता ते मॅनेजमेंट गुरु ते आमदार अमोल पाटलांकडून अपेक्षा आहे.