बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय विधी सेवा दिना निमित्त बोदवड न्यायालयात कायदेशीर साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन बोदवड तालुका विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात आले होते. यावेळी दुर्बल घटकांना कायदेशीर सेवा पुरविणे हा विधी सेवा प्राधिकरणेचा व कायद्याचा उद्देश आहे असे प्रतिपादन तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन टी. पाटील यांनी केले. यावेळी पुढे बोलतांना अर्जुन पाटील यांनी सर्व नागरिकांसाठी निष्पक्ष आणि न्याय प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता पसरवण्यासाठी भारतात दरवर्षी राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जातो.हा दिवस साजरा करण्याचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांतील लोकांना मोफत, कार्यक्षम आणि कायदेशीर सेवा प्रदान करणे हा आहे.
कायद्यातील विविध तरतुदी आणि याचिकाकर्त्यांच्या हक्कांबद्दल नागरिकांना शिक्षित करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जातो.या दिवशी, प्रत्येक अधिकारक्षेत्रात कायदेशीर मदत शिबिरे, लोकअदालत आणि कायदेशीर मदत कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना सहाय्य देण्यासाठी 1995 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने याची सुरुवात केली होती.हे महिला, अपंग व्यक्ती, अनुसूचित जमाती, मुले, अनुसूचित जाती,मानवी तस्करी पीडित तसेच नैसर्गिक आपत्तींना बळी पडलेल्यांना मदत पुरवते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधिश क्यु.यु.एन शरवरी हे होते. सदर कार्यक्रमास वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन टी. पाटील .सदर कार्यक्रमात वकील संघाचे सचिव ॲड. धनराज प्रजापती, ॲड. किशोर ए महाजन , देवयानी बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अविनाश राठोड तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी, ॲड. सी. के. पाटील न्यायालय अधीक्षक वैभव तरटे , विधी सेवा योगेश पाटील, यांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने पक्षकार मंडळी उपस्थित होते.