विधानसभा निवडणुकीच्या काळात ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १० हजार १३४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. यासह राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Protected Content