सट्टा बाजाराचा कौल महायुतीलाच ! : भाजप बनणार सर्वात मोठा पक्ष

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एक्झीट पोलच्या पाठोपाठ सट्टा बाजाराने देखील महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार असल्याचा कौल दिला आहे. यात भाजप सर्वात जास्त जागा मिळवणार असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
काल मतदान संपताच एक्झीट पोल जाहीर केले होते. यात विविध एक्झीट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज दर्शविण्यात आले आहेत. तर महायुतीला बऱ्याच जणांनी झुकते माप दिले आहे. आता सट्टा बाजाराचा कल देखील याच मार्गाने जात असल्याचे दिसून आले आहे.

फलोदीच्या सट्टा बाजारातील कल हा अतिशय अचूक असा मानला जातो. यानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीला सत्ता मिळणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. यात महायुतीला 141 ते 155 च्या दरम्यान जागा मिळून त्यांना पुन्हा सत्ता मिळवणार असल्याचा कल समोर आला आहे. यात भारतीय जनता पक्षाला 90 ते 95 जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे. तसेच, बिकानेरच्या सट्टा बाजाराने देखील अशाच प्रकारे महायुतीला यश मिळणार असल्याचे दाखवून दिले आहे.

Protected Content