Home Cities अमळनेर पतीपत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

पतीपत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील वासरे गावात पती पत्नीचे घरघुती कारणावरून शाब्दिक वाद सुरू असतांना झालेल्या गैरसमजुतीतून तीन जणांनी पतीसह पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली. याप्रकरणी दुपारी ३ वाजता मारवड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील वासरे गावात विलास माधवराव पाटील व त्यांची पत्नी मिनाबाई पाटील यांचे घरघुती कारणावरून शाब्दिक वाद सुरू होता. त्यावेळी शंकर रघुनाथ पाटील याला वाटले की मला बोलत आहे. या गैरसमज झाल्याने दारूच्या नशेत येवून शंकर रघुनाथ पाटील व त्याचा मुलगा अमोल शंकर पाटील आणि सागर शंकर पाटील यांनी लाकडी दांडक्याने विलास पाटील आणि मिनाबाई पाटील यांना अमोल पाटील व सागर पाटील या दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि हातपाय तोडण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या विलास पाटील यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मिनाबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर रघुनाथ पाटील, अमोल शंकर पाटील आणि सागर शंकर पाटील सर्व राहणार वासरे ता.अमळनेर याच्या विरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.


Protected Content

Play sound