आग्रा वृत्तसंस्था । यमुना ‘एक्सप्रेस वे’वरून जाणारी बस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात २९ प्रवासी ठार झाले असून १२ जण जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, आज सकाळी यमुना एक्सप्रेस वे वरून जाणारी बस झरना नाल्यास कोसळली. यात २९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे. दरम्यान, बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.