जळगाव जनता बँकेचा वारकर्‍यांसाठी मदतीचा हात

जळगाव प्रतिनिधी । येथील जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे वारकरी भक्तांसाठी दैनंदिन वापराच्या साहित्याच्या वितरणासाठी रविवारी बँकेचे वाहन पंढरपूरच्या दिशेने रवाना करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील सद्गुरू संत श्री सखाराम महाराज संस्थान (अमळनेर), श्री राम मंदिर संस्थान (जळगाव), संत मुक्ताबाई दिंडी व श्रीराम पालखी या पायी वारी करून पंढरपूरला जातात. या दिंडींमध्ये सहभागी होणार्‍या वारकरी भक्तांना रोजच्या दिनचर्येच्या वस्तू जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या वस्तू वितरणासाठी बँकेचे वाहन पंढरपूरकडे रवाना झाले. या वाहनाला बँकेच्या मुख्य कार्यालयात संचालक सतीश मदाने, सुरेश केसवाणी, हरिश्‍चंद्र यादव, कृष्णा कामठे, संचालिका डॉ. आरती हुजूरबाजार, सावित्री सोळुंके, शशिकांत बेहेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, महाव्यवस्थापक संजय नागमोती, सुनील अग्रवाल, विभागीय अधिकारी कपील चौबे, बापूसाहेब महाले, रवींद्र देवचके आदींनी वाहनाची विधिवत पूजा केली. त्यानंतर वाहन वारकरी भक्तांसाठी दैनंदिन वापराचे साहित्य वितरणासाठी रवाना झाले.

Protected Content