Home Cities एरंडोल एरंडोल येथे अभिनेता गोविंदा यांची भव्य रॅली !

एरंडोल येथे अभिनेता गोविंदा यांची भव्य रॅली !

0
131


एरंडोल/पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात आता निवडणूकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे किंवा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेते गोविंदा आहुजा यांची रॅलीचे आयोजन १६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.

एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्ष महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात महायुतीचे कार्यकर्ते अमोलदादांचा प्रचार करत आहे. तसेच अमोलदादा पाटील हे देखील मतदार संघात प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. अमोलदादा पाटील यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते गोविंदा हे एरंडोल शहरात येत आहे.


Protected Content

Play sound