Home क्राईम विष घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

विष घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू


जळगाव प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील सारोळा येथील 50 वर्षीय व्यक्तीने पिक फवारणीचे विषारी औषध घेतले होते. त्याचा शनिवारी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील सारोळा येथील रहिवाशी किसन लाला पवार (वय ५०) रा. सारोळा ता.पाचोरा याने शनिवारी रात्री ९.३० वाजता पिक फवारणीचे विषारी औषध घेतले. त्याला अत्यवस्थ वाटल्याने नातेवाईकांना खासगी वाहनाने शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता रात्री ११.१५ वाजता त्यास वैद्यकिय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी मृत घोषीत केले. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound