जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात बेकायदेशीररित्या व अवैधपणे गॅस भरीत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोन वाहने जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ५ वाजता घडली होती याप्रकरणी अवयवितरित्या गॅस भरत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातील एमआयडीसी पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये वाहनांमध्ये घरगुती गॅस भरत असताना अचानकपणे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. घटना मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
या आगीत या आगीत संजय दालवाला, भरत दालवाला, प्रतिभा दालवाला, सुरज दालवाला, रश्मी दालवाला, देवेश दालवाला, संदीप शेजवळ, आरिफ अहमद रहमान शेख, राकेश पांडुरंग पाटील आणि गॅस भरणारा दानिश शेख अनिश शेख सर्व रा. जळगाव हे आगीत भाजले गेले होते. तर जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १५ बीएक्स २८१२ आणि एका दुचाकी क्रमांक (एमएच १५ बीएक्स २८१२) ने पेट घेतल्याने दोन्ही वाहने जळून खाक झाली आहे. घरगुती गॅसचा वापर करून गॅस हा वाहनांमध्ये भरत असल्याने हा स्फोट झाला. त्यामुळे गॅस भरणारा संशयित आरोपी दानिश अनिस शेख रा. तांबपुरा, जळगाव याच्या विरोधात पो.कॉ. इम्रान रहीम बेग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत आहे.