किराणा दुकानावर छापा टाकून अवैध गुटख्याचा साठा जप्त

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या एका किराणा दुकानावर छापा टाकून प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करणाऱ्यावर रामानंदनगर पोलिसांनी मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता कारवाई केली असून ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा बाजार पाट्ट्यातील नीरज किराणा दुकानात अवैधपणे गुटखा विक्री होत असल्याची गोपनिय माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता पथकाने कारवाई करत निरज किरणा दुकानावर दुकानावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ८ हजार ८०० रुपये किंमतीचा विमल गुटख्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक रेवानंद साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किराणा दुकानदार नीरज रवींद्र वाणी वय-२६, रा. पिंप्राळा, जळगाव याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भारुडे हे करीत आहे.

Protected Content