मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड मुक्ताईनगर मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलीसांनी हल्लेखोरांना शिताफीने अटक केली आहे. यातील एकाला चौकशीकमी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. यातील दोन आरोपी हे फार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड मुक्ताईनगर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे हे निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी शिरसाळा येथील मारूती मंदीरात नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केल्यानंतर त्याची प्रचार फेरी राजूर गावात सुरू असतांना दुचाकीवर असलेल्या काहींनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंत हल्लेखोर हे पसार झाले होते. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोदवड आणि मुक्ताईनगर पोलीसांनी गोपनिय माहितीच्या आधारे अवघ्या बारातासात गुन्ह्याचा छडा लावला आहे. यातील तीन जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित दोन आरोपी फरार झाले आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपी दिपक दादाराव शेलोडे (वय २२ रा. येवती ता.बोदवड) आणि आयुष उर्फ चिकू गणेश पालवे (वय १९ रा. नाडगाव ता.बोदवड) यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. तर विकी गुरचड वय ३० रा. नाडगाव ता.बोदवड याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून उर्वरित इतर दोन जण फरार झाले आहे. यासंदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहीते आणि बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोळे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.