कारण नसतांना तिघांवर प्राणघातक हल्ला; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सारबेटा येथे काहीही कारण नसतांना एका तरूणासह चुलत भाऊ व भाच्याला लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे.

याप्रकरणी बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात मारहाण करणारे ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, सरफराज खान गुलाम हुसैन वय २७ रा. सारबेटा ता. अमळनेर हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास सरफराज खान हा घरासमोर उभा होता. त्यावेळी काहीही कारण नसतांना गावात राहणारे इमरान खान जाकीर खान, सलमान खान जाकीर खान, आरीफ खान हनीफ खान, नाजिम खान गुलताज खान, गुलाम रसुल खान, गुलजता खान हनीफ खान, मुस्ताफा हशील खान, शकील खान अख्तर खान सर्व रा. सारबेटा ता. अमळनेर यांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. सरफराज खान याचा चुलत भाऊ मौसिन खान मशीद खान व भाचा फैजल खान याांना देखील मारहाण करण्यात आली. जखमी झालेल्या तिघांवर अमळनेर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

याप्रकरणी सरफराज खान गुलाम हुसैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.

Protected Content