Home क्राईम पेपर मील कंपनीतून सामानांची चोरी

पेपर मील कंपनीतून सामानांची चोरी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारात ईश्वर पेपर मील कंपनीतून ६५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता समोर आली. याप्रकरणी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भवानजी विश्रामभाई पटेल वय ६४ रा. शिवराम नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारात ईश्वर पेपर मील कंपनी आहे. २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कंपनीतून पेपर मीलसाठी लागणारे ६५ हजार रूपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी हा प्रकार उघडकीला आल्यानंतर भवानजी पटेल यांनी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुकुंद पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound