धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव ग्रामीण मतदारसंघातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आधी जळगाव शहरातून डॉ. अनुज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तथापि, अन्य मतदारसंघात कुणीही उमेदवार जाहीर झाला नव्हता. यानंतर आता पक्षाच्या ताज्या यादीत जळगाव ग्रामीणमधून मुकुंदा रोटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत.
मुकुंदा रोटे हे नशिराबाद येथील रहिवाशी असून ते पहिल्यापासून मनसेमध्ये कार्यरत आहेत. विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनहिताचे अनेक कामे केली आहेत. याचीच पावती म्हणून त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले होते. यानंतर आता त्यांना पक्षाने जळगाव ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे. ते मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.