अमळनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात अमळनेरातून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अजित पवार गटाने आज ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अनिल भाईदास पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल भाईदास पाटील हे अमळनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. यानंतर मात्र ते अजित पवार यांच्यासोबत गेले होते. त्यांना राज्य मंत्रिमंडळात मदत व पुनर्वसन यासारखे अतिशय महत्त्वाचे खाते देखील मिळाले होते. तसेच त्यांच्यावर पक्षाच्या प्रथोत पदाची देखील जबाबदारी टाकण्यात आली होती. या निवडणूकीत त्यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे आधी स्पष्ट झाले होते आजच्या यादीतून यावर शिक्कामोर्तब झाले आहे.