Home राजकीय मनसेतर्फे जळगावातून डॉ. अनूज पाटील यांना उमेदवारी

मनसेतर्फे जळगावातून डॉ. अनूज पाटील यांना उमेदवारी

0
108

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव शहरातून डॉ. अनूज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आपली ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. यात प्रामुख्याने मुंबई, नवीन मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांमधील उमेदवारांचा समावेश आहे. यातच जळगाव शहरातून डॉ. अनूज पाटील यांना उमेदवारी प्रदान करण्यात आलेली आहे.

डॉ. अनूज पाटील हे जळगाव नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. के. डी. पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या वडिलांनी २००१ सालच्या निवडणुकीत प्रदीप रायसोनी यांच्या सारख्या मातब्बर उमेदवाराला पराभूत करण्याची किमया केली होती. आता त्यांचे पुत्र विधानसभेच्या रिंगणात उतरून राजकारणात पदार्पण करत असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.


Protected Content

Play sound