Home Cities यावल अमोल जावळे व कुंदन फेंगडेंनी साधला महिलांशी संवाद

अमोल जावळे व कुंदन फेंगडेंनी साधला महिलांशी संवाद


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विविध सामाजिक कार्याने संपूर्ण रावेर-यावल विधानसभा क्षेत्र पिंजुन काढणारे भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस डॉ कुंदन फेगडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल येथे देशमुख वाड्यात बचत गट व भाजपा महिला आघाडी व माता भगिणींशी भेट घेऊन त्यांच्या संवाद साधला.

याप्रसंगी पक्षाचा प्रचार व प्रसारासह संघटनेच्या वाढीसाठी अथक प्रयत्न करणारे भाजपचे पूर्व विभागाचे जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवारास कशा पध्दती विजयी करायचा आहे. यासंदर्भात महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले, यावेळी जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रविन्द्र उर्फ छोटू पाटील, भाजपा यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, यावल शहर अध्यक्ष राहुल बारी, महिला विकास आघाडी अध्यक्ष नंदाताई महाजन, युवा मोर्चाचे सागर चौधरी, योगेश चौधरी, रितेश बारी, विशाल सिरके, कोमल इंगळे यांच्यासह मोठया संख्येत पक्षाचे कार्यकर्ते आदी या प्रसंगी उपस्थित होते.


Protected Content

Play sound