पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर सह परिसरात अवकाळी व मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात विज पडून निंबाचे झाड जळून खाक झाले आहे. पहूर सह परिसरात सध्या अवकाळी व मुसळधार पाऊस पडत आहे.
काल रात्री ढगांच्या गडगडाटासह सह विजांच्या कडकडाट होऊन पहूर पेठ येथील विजय त्र्यंबक देशमुख यांच्या शेतात असलेल्या शंभर वर्ष जुने असलेल्या हिरव्यागार निंबाच्या झाडावर वीज पडून निंबाचे झाड जळून खाक झाले आहे. तर परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेत शिवारात पाणी तुंबले आहे. शेतकऱ्यांचे हातात तोंडाशी आलेले कपाशी, सोयाबीन, मक्का इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून एन दिवाळीच्या सणात शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.