खा. बन्सीलाल गुर्जर यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यात सर्वत्र निवडणुकीचे बिगुल वाजले असून रावेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदारसंघातील फैजपुर, न्हावी आणि बामणोद व जिल्हा परिषद तसेच फैजपुर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्ष संघटनात्मक बैठक भारतीय जनता पक्षाच्या भारतीय किसान मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार बन्सीलाल गुर्जर यांच्या प्रमुख उपास्थितीत बैठक पार पडली.

फैजपुर तालुका यावल येथे संपन्न झालेल्या या पक्षसंघटनाच्या महत्वाच्या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, जळगाव लोकसभा निवडणुक प्रमुख राधेश्याम चौधरी , भारतीय जनता पक्षाच्या किसान मार्चाचे चे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, भाजपाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी ,भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ कुंदन फेगडे , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन , पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , तालुका सरचिटणीस विलास चौधरी व उज्जैनसिंग राजपूत , फैजपुरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, माजी पंचायत समिती उपसभापती भरत महाजन यांच्यासह तालुक्यातिल सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते .

Protected Content