पिकअप वाहन व डंपरच्या धडकेत चालक ठार; अन्य दोघे जखमी

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा ते मोढाळा रस्त्यावरील शेताजवळ पिकअप वाहन आणि डंपर यांच्या झालेल्या भीषण अपघातात पिकअप वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले दोन गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावसिंग रामदास पवार, रा. धानोरी ता. बोदवड जि जळगाव असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा ते मोढाळा रस्त्यावरील शेताजवळ पिकअप वाहन (MH-19 CY-8049) आणि डंपर क्रमांक (MH-19-Z-3943) यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातात पिकअप वाहनातील चालक भावसिंग पवार याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले प्रविण संजय जाधव, अजय आनंदा बेलदार हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी ईश्वर संजु जाधव, वय-25 रा. धानोरी ता बोदवड जि जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नंदकिशोर काळे हे करीत आहे.

Protected Content