Home क्राईम आसाममध्ये तीन मुस्लिम तरुणांना मारहाण ; जय श्रीराम म्हणण्यास पाडले भाग

आसाममध्ये तीन मुस्लिम तरुणांना मारहाण ; जय श्रीराम म्हणण्यास पाडले भाग

0
110


marhan
 

गुवाहाटी (वृत्तसंस्था)आसामच्या बारपेटा जिल्ह्यात चार समाजकंटकांनी तीन मुस्लिम तरुणांना अमानुष मारहाण करत त्यांना जय श्रीराम म्हणण्यास जबरदस्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, फखरुद्दीन अली अहमद मेडिकल कॉलेजच्या जवळ एक गाव आहे. शुक्रवारी इथे चार बाइकस्वार पोहोचले आणि त्यांनी एक कर्मचारी रकीबुल हक याला मारहाण केली. समाजकंटकांनी कुर्बान खान आणि बुरान अली यांना पकडले. ही दोन्ही मुले एका चहाच्या टपरीवर काम करतात. ते समाजकंटक कोणतेही कारण नसताना कुर्बान खान आणि बुरान अली यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्या समाजकंटकांनी तिन्ही तरुणांना जय श्री राम म्हणण्यास भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीय.


Protected Content

Play sound