Home राजकीय आ. झिशान सिद्दिकी यांनी घेतली फडणवीसांची भेट

आ. झिशान सिद्दिकी यांनी घेतली फडणवीसांची भेट


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गत आठवड्यात गोळ्या घालून हत्या झाली होती. या घटनेनंतर त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनी आज शुक्रवारी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांकडे न्यायाची मागणी करत आपल्या वडिलांच्या हत्येशी संबंधित सर्व धागेदोरे तपासण्याची मागणी केली आहे.

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांची गत 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या लॉरेन्स बिश्नोई गँगने केल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना अटकही केली आहे. त्यांची चौकशी सुरू असताना झिशान सिद्दीकी यांनी शुक्रवारी दुपारी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यावेळी त्यांना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासाशी संबंधित इत्यंभूत माहिती देण्यात आली.त्यानंतर झिशान यांनी प्रस्तुत प्रकरणात आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना न्याय हवा असल्याचे स्पष्ट केले. बाबा सिद्दीकी हे अभिनेते सलमान खान यांचे निकटवर्तीय होते. लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तत्पूर्वी, इशारा म्हणून त्यांनी सिद्दीकी यांची हत्या केल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound