रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर येथील स्टेट बँकेतील सुरक्षा रक्षक तथा माजी सैनिकांच्या मोटार सायकलला अचानक आग लागून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडली.
रावेर शहरातील स्टेट बँकेतील सुरक्षा रक्षक तथा माजी सैनिक राजेंद्र रामदास चौधरी यांनी स्टेट बँकेच्या आवारात दुपारी दोन वाजेच्या सुमारास मोटार सायकल हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच १९ – ५२७५ ला अचानक आग लागून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडली.
आग लागताच सुरक्षा रक्षक तथा माजी सैनिक राजेंद्र चौधरी व विवेक भदे यांनी आग लागलेल्या मोटार सायकल जवळील इतर मोटर सायकली इतरत्र हलविल्या यामुळे मोठ अनर्थ टळला. रावेरच्या अग्निशमन दलाने आग विझवली मात्र तो पर्यन्त मोटार सायकल जळून खाक झाली .