ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये घेतली आहे. त्यांच्यासोबतच सुरेंद्र चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच ५ आमदारांनीही शपथ घेतली आहे. शपथ घेण्यापूर्वी ओमर अब्दुल्ला यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक शेख मुहम्मद अब्दुल्ला यांना श्रद्धांजली वाहिली.

ओमर अब्दुल्ला हे केंद्रशासित जम्मू-काश्मीरचे पहिले आणि मुख्यमंत्री दुसऱ्यांदा बनले आहे. या शपथविधीवेळी इंडिया आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये राहूल गांधी, प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे, मेहबुबा मुफ्ती, डी. राजा, अखिलेख यादव यांचा समावेश होता. दरम्यान, काँग्रेसने एनसी सोबत युती केली असली तरी सरकारमध्ये सामिल होण्यास नकार दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती होती. एनसीने विधानसभा निवडणुकीत ४२ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत.

Protected Content