हितेंद्र ठाकूरांना मोठा धक्का; मोठा नेता भाजपच्या वाटेवर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बहूजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर हे वसई-विरारच्या राजकारणात मोठा चेहरा म्हणून मानले जातात. आता विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांचे आतेभाऊ राजीव पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ठाकूरांना मोठा धक्का बसला आहे.

राजीव पाटील हे वसई विरार महानगरपालिकेचे पहिले महापौर होते. ते विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक होते, पण त्यांना संधी मिळाली नाही. आता ते आपल्या ५० पेक्षा जास्त माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश घेणार आहे. राजीव पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आठवडाभरपसून सुरू आहे. वसई विरार परिसरात ठीक ठिकाणी लागलेल्या बॅनर वर केवळ राजीव पाटील यांचाच फोटो झळकत आहे. तर दुसरीकडे वसई विरार शहरात बहुजन विकास आघाडी पक्षाच्या लागलेल्या बॅनर वरून राजीव पाटील यांचा फोटो वगळला आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

 

Protected Content